शेतीचा
पर्यावरणीय अंगाने विचार कधी करणार?
डॉ.
निलेश हेडा
आपले शेतीचे आणि पर्यायाने
शेतक-यांचे अनेक प्रश्न वृहद अशा पर्यावरणीय प्रश्नांचा एक भाग आहे हे विसरुन आपण वाटचाल
करत आहोत. शेतक-यां सोबत काम करणारे कार्यकर्ते आणि नेते सुद्धा ह्या मुलभूत अशा सत्या
कडे पाठ फिरवून उभे आहेत आणि जणू शेती म्हणजे केवळ आणि केवळ मानव निर्मित धान्य निर्मितीचा
कारखाना आहे अशा चुकीचे दृष्टीकोनाने काम करत आहे.
शेती ही एक मानव निर्मित
परिसंस्था (Ecosystem) आहे. कोणतीही परिसंस्था ही अक्षरश: लाखोअशाजैविकआणिअजैविकघटकांचीबनलेलीअसते.
परिसंस्थेत जैविक आणि अजैविक घटकात एक प्रकारचे संतुलन असते. ह्यातला एक घटक दुस-या
घटकाला सतत पदार्थ आणि उर्जेची देवानघेवान करत जगत असतो. परिसंस्थेमधल्या जैविक घटकात
अनेक प्रजातींचा समावेश होतो. पिकांच्या विविध जाती, त्यावर येणारी कीड, शेतीशी संबंधीत
विविध जंगली व पाळीव पशुपक्षी, प्राणी यांनी शेतात एका अन्नसाखळीचा (Food Chain) उदय
होतो, अनेक अन्नसाखळ्या जोडल्या जाऊन अन्नजाळ्याची (Food Web) निर्मिती होते. ही नैसर्गिक
संरचना निसर्गाला निर्माण करण्याकरीता अनेक कोटी वर्षे खर्च करावी लागलीत हे उत्क्रांतीशास्त्र
आपल्याला सांगते. “जिवोजिवश्चजिवनम” हे निसर्गातले चक्र शेतीतही बघायला मिळते. अशा
अन्नसाखळीत आणि नैसर्गिक संरचनेत दोष निर्माण झाला की मग शेतीच्या अंतहीन प्रश्नांना
सुरुवात होते हे तत्व आता समजुन घ्यावे लागेल. जैवविविधता म्हणजे जीवाजीवांमध्ये असणारी
विविधता. तो जसा निसर्गाचा प्राण आहे तसाच तो शेतीचा सुद्धा मूळ गाभा आहे. निसर्गाचा
स्वभाव हा एकसुरीपणाकडून विविधतेकडे जाण्याचा आहे. शेतीचा सुद्धा तोच प्राण होता. पण
केवळ बाजारपेठेच्याआहारीजाऊनजीएकसुरीपणाचीशेतीबाजारपेठेनेशेतक-यांच्या हाती दिली त्या
एकसुरीपणातुन विशिष्ट किटक वाढून अचानक रोगांनी शेतीचसंपूनतरजाणार नाहीनाअशीभितीनिर्माणझालीआहे.
सर्वव्यापक अशा नैसर्गिक
व्यवस्थेतला शेती हा एक छोटासा भाग मात्र आहे हे आपण विसरायला नको. 3.५ अब्ज वर्षां
आधी समुद्रात पहिल्या जीवाचा जन्म झाला आणि त्यानंतर सुरुवातीला एकसारख्या दिसणा-या
जीवांनी विविध रुपधारण केले आणि आज अतीषय समृद्ध आणि विविधतेने नटलेली जीवसृष्टी आपण
बघतो. त्या मानाने शेती फारच नवीन असा मानवाचा कार्यकलाप आहे. मागच्या केवळ १० हजार
वर्षांआधी शेतीची सुरुवात झाली. आणि मागच्या केवळ ३० ते चाळीस वर्षात शेतीचा संपूर्ण
चेहरा मोहरा आपण बदलऊन टाकला. बियांनाच्या पारंपरिक जाती नष्ट करुन टाकणे, शेतीसोबतच
पर्यावरणात मोठ्या प्रमाणावर विष पेरणे अशा विघातक बदलाने संपूर्ण शेतीची शाश्वतता
भंग करुन टाकली आहे.
शेतकयांच्या दूरावस्थेत
सरकारी धोरणात्मक बदलाचा निश्चितच फार मोठा हात आहे पण केवळ तेच एक कारण आहे असे माणून
इतर पर्यावरणीय कारणांकडे डोळेझाक करणे म्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे. ह्या देशात सरकारच्या
धोरणात्मक चुकीविरुद्धलढण्यासाठी शेतक-यांची प्रचंड मोठी उर्जा कारणी लावल्या गेली.
ते चांगलही होतं. त्याने शेतकयांना प्रचंड मोठा आत्मविश्वास दिला यात दुमत नाही पण
सोबतच पर्यावरणीय अंगाने शेती प्रश्नाचा विचारच केल्या गेला नाही. तसा विचार करण्यासाठी
शेतक-यांना प्रवृत्त सुद्धा केले गेले नाही. त्यामुळे शेतीला केवळ एक उत्पादन देणा-या
कारखाण्या चे स्वरुप आले. त्यामुळे उत्पन्नात तात्पुरती वाढ नक्कीच झाली पण दुरागामी
परिणामात मात्र आपले नुकसानच झाले.
समजा शेतक-यांचे सरकार
आले. शेतक-यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या. शेतीला शेतकरी जो भाव मागतात तो मिळाला.
तरी शेतकरी सुखी होईल याची शाश्वती कोणी देऊ शकतो काय? इतकं होऊन अचानक रोग आला, पाऊस
आला नाही, किंवा जास्त आला, जमीनीची उत्पादकता कमी झाली तर काय करणार? अशा परिस्थितीत
अनुरुपव्यवस्थापनाचे (Adapative Management) लवचीकतत्व आपण अंगीकारायला पाहिजे. सरकार
आणि व्यवस्थेसोबतची लढाई सुरु ठेवायला हवी पण त्याच सोबत निसर्गानुकूल शेतीच्या प्रयोगाचा
जास्तीत जास्त प्रसार सुरु ठेवायला हवा.
आता शाश्वत शेतीच्या
विचाराची गंभीर चिकित्सा करण्याची गरज निर्माण झाली आहे. पर्यावरणाचा नाश करुन शेती
हा कधीच फायद्याचा व्यवसाय होऊच शकत नाही. आधुनिक शेतीत जरी निकटगामी भरपूर फायदा दिसत
असला तरी दूरागामी आणि येणा-या पिढ्यांचा विचार केला तर ते शाश्वत नाही हे आता हळुहळू
सिद्ध व्हायला लागले आहे. माझ्या मते सद्याची शेती ही धोक्यात असलेली परिसंस्था बनली
आहे. परिसंस्था जेव्हां नाजूक बनते तेव्हा विनाश होतो. अशा परिस्थितीत पर्यावरणानुकूल
शेतीवरच भर द्यावा लागेल. शाश्वत शेतीत फायदा मिळत नाही हे बाजारपेठेने पसरवलेले ’मिथ’
झटकून टाकावे लागेल. परिसंस्था, जैवविविधता, शाश्वत विकास, अन्नसाखळी, पर्यावरण संतूलन,
इत्यादी शब्द केवळ अभ्यासका पुरते प्रयोग शाळांच्या चार भिंतीत न राहता त्यांना शेतात
न्यावे लागेल. तेव्हांच शेती शाश्वत होईल.
(लेखक
निसर्ग अभ्यासक आणि रुफोर्ड मॉरिस
फाउंडेशन, लंडनचे नदी अभ्यासाच्या बाबतीतले फेलो आहेत.)
No comments:
Post a Comment