Monday, July 13, 2009

नानो ठिक आहे पण पर्यावरणाचं काय?

नानो ठिक आहे पण पर्यावरणाचं काय?
नानो कार मोठ्या थाटात रस्त्यावर येत आहे. प्रत्येक भारतीयांच स्वप्न पूर्ण होईल असं आश्वासन टाटांनी दिलं आहे. जन सामान्यात सुद्धा या कार बद्दल भरपूर आकर्षन आहे. परंतू ह्या कारच्या पर्यावरणीय किमती बद्दल कोणीही बोलतांना दिसत नाही. आज संपूर्ण जग जागतीक तापमान वाढीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. ह्या वातावरनातल्या बदलांनी गेल्या ४.५ अब्ज वर्षात ह्या पृथ्वीवर निर्माण झालेली सजीव सृष्टी संपेल की काय अशी भीषण परिस्थिती आज निर्माण झाली आहे. खणीज तेलांच्या ज्वलनाने अमर्यादीत प्रमाणात वातावरणात वाढलेला कर्बाम्ल वायू ह्या परिस्थितीला कारणीभूत आहे. इ.स. १७०० नंतर आजवर हवेत कर्बाम्ल वायूचे प्रमाण ३६ टकक्यांनी वाढले आहे, पृथ्वीच्या गेल्या ६५०,००० वर्षातले हे कर्बाम्ल वायूचे सर्वात जास्त प्रमाण आहे. ह्याचा परिणाम म्हणजे गेल्या शतकात पृथ्वीचे तापमान ०.७५ अंश सेल्सीयसनी वाढलेले आहे. परिणामत: मांसूनचे चक्र बिघडणे, ध्रुवावरचा बर्फ वितळने, जैवविविधता संपने, वाळवंटांचे क्षेत्रफळ वाढणे, रोग निर्माण करणाऱ्या प्रजाती वाढणे, जागतीक अन्न धान्याचे उत्पादन घटने असे धोके निर्माण झालेले आहेत.
नानोच्या कमी किमती मुळे, सहावा वेतन आयोग लागू झाल्याने व सहजरित्या उपलब्ध कर्जाने आज नानो कार घेणे सर्वसामान्य मानसाला सुद्धा परवडणार आहे. सुरुवातीला एक लाख कारी रस्त्यावर येणार आहे. एक कार जर स्वत:च्या इंजीनात १ लिटर इतके पेट्रोल जाळत असेल तर ती सरासरी २ किलोग्राम इतका कर्बाम्ल वायू वातावरणात सोडते ! अशा प्रकारे लाखोंच्या संखेत निर्माण होणाऱ्या कारी भारताच्या पर्यावरणाला किती मोठा धोका निर्माण करतील याचा विचारच चिंताक्रांत करणारा आहे. टाटांनी आणि त्यांच्या संगनमताने सरकारने नानोची किमत कमी करतांना पर्यावरणाची किमत मुळीच विचारात घेतलेली नाही. तशी किमत जर विचारात घेतली तर नानोची किंमत कितीतरी जास्त असती. याचाच अर्थ समाजातील एक विशीष्ट वर्ग, आपल्या कडे असलेल्या संपत्तीच्या जोरावर तंत्रज्ञान उपभोगेल आणि अशा तंत्रज्ञानामुळे निर्माण होणाऱ्या प्रश्नांची किमत निसर्गावर अवलंबून असणाऱ्या शेतकरी, मासेमार, आदिवासींना भोगावी लागेल. हा पर्यावरणीय भेदभाव आपल्याला कोठे घेऊन जाईल ? जागतीक पर्यावरण कायद्यातील पोल्युटर पे प्रिंसीपल’ [polluter pays principle] (जो प्रदुषन करेल तो किंमत मोजेल तत्व) सांगते की एखादा कारखाना जर प्रदूषन करत असेल तर त्यामुळे जी पर्यावरणाला हाणी होईल त्याची किमत कारखानदाराने भरावी. जेणे करुन निर्माण होणाऱ्या राशीतून पर्यावरण संरक्षणाची कामे करता येतील. परंतू नानोची किमत ठरवतांना असा विचार मुळीच केलेला दिसत नाही जर तसा विचार केला असता तर नानोची किमत किती तरी कमी असती. टाटांच्या नानोबद्दल वारंवार प्रसार माध्यमात सांगण्यात येते की नानो ही पर्यावरण अनुकूल अशी कार आहे. परंतू वस्तूस्थिती अशी आहे की डिझेल किंवा पेट्रोलवर चालणारी कोणतीही कार ही पर्यावरण अनुकूल असूच शकत नाही. केवळ सुर्यप्रकाशावर चालणारी कारच केवळ पर्यावरण अनुकूल असू शकते.
आजमीतीला भारतात दळणवळनाच्या संबंधात प्रदुषन निर्मिती संबंधात कोणतीही सुस्पष्ट अशी नीती नाही. सुरक्षेच्या साधनांविषयी वाहन कंपन्या तडजोड करतांना दिसतात. अमुक एका संखेने कारी बाजारात उतरवन्याच्या आधी पार्किंग किंवा सुरक्षीत रस्त्यांच्या बाबतीत कंपन्याना आणि राजकारन्यांना सोइरसुतक नसते. हीच परिस्थिती टाटा नानो बद्दल आहे.
आज गरज आहे की पारंपरिक उर्जा स्त्रोतांना बगल देऊन कशा प्रकारे पर्यावरण अनुकूल दळणवळनाची साधने बाजारात येतील. ज्याने स्वच्छ उर्जा आणि पर्यावरण पुरक विकास घडवता येईल अशा संशोधनांना सुद्धा उत्तेजन देण्याची गरज आहे. टाटांसारख्या महत्वाच्या व्यापारी संघटना अशा प्रकारची पर्यावरण पुरक दळणवळनाची साधने बाजारात आणू शकतात. त्यादृष्टीने टाटांनी नानोचे सुर्य प्रकाशावर चालणारे माडेल बाजारात आनण्याची खटपट चालवल्याची बातमी आहे, ज्याला त्यांनी इ-नानो असे संबोधन दिले आहे. जर अशा प्रकारची कार, टाटा तातडीने बाजारात आनू शकले तर पर्यावरणाला तर याचा फायदा होईलच परंतू अशा इ-नानोची निर्यात जगातील इतर देशांना करुन भारताच्या खऱ्या विकासात हातभारही लागेल यात शंकाच नाही.

डा. नीलेश हेडा
कारंजा (लाड), जील्हा वाशीम
( ०९७६५२७०६६६
(लेखक रुफोर्ड मारीस फाउंडेशन, लंडन चे नदी अभ्यासाच्या बाबतीतले फेलो आहेत).

No comments:

Post a Comment