Tuesday, May 26, 2020


मा. श्री. नितिनजी गडकरी यांना वाढदिवसाच्या असंख्य शुभेच्छा.
27.05.2020

ग्रामिण भागात विकेंद्रित स्वरुपात रोजगार निर्मितीच्या बाबतीतली आपली तळमळ दूरदृष्टीच्या अनुषंगाने आपल्या वाढदिवसाचे निमित्य साधुन ग्रामीण रोजगार बळकटीकरणाच्या दिशेने एका लोक चळवळीचा जन्म व्हावा या दृष्टीने एक अत्यंत संक्षिप्त टिपन आपल्या वाढदिवसाची भेट म्हणूनआपल्या शुभहस्ते शुभारंभ.
  
स्थानिक पारंपरिक खाद्य पदार्थांच्या द्वारे विकेंद्रित रोजगार निर्मितीच्या लोक चळवळीचा श्रीगणेशा

डॉ. निलेश हेडा आणि सचिन कुळकर्णी
संवर्धन समाज विकास संस्था, कारंजा लाड, जि. वाशिम ४४४१०५
ग्रिन्झा फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि. आणि परिवर्तन ऑरगॅनिक फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि.
9765270666, 9421745233 www.samvardhan.org.in

1.  प्रस्तावना

भारत पारंपरिक खाद्य पदार्थांच्या बाबतीत विविधतेने संपन्न असा देश आहे. या पारंपरिक खाद्य पदार्थांच्या अनुषंगानेच एका अत्यंत पुढारलेल्या खाद्य संस्कृतीचा जन्म इथे झाला आहे. स्थानिक नैसर्गिक संसाधने, ऋतू, पोषण मुल्य, चव अशा सर्व बाबींचा सांगोंपांग विचार करुनच गेल्या हजारो वर्षांमध्ये इथली खाद्य संस्कृती विकसीत झालेली दिसते. मात्र गेल्या काही दशकांमध्ये या स्थानिक खाद्य पदार्थांकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष होऊन अनेक पारंपरिक खाद्य पदार्थ विलुप्तीच्या मार्गावर आहेत. अशा स्थानिक खाद्य पदार्थांचे आंतर्राष्ट्रीय माणकांवर सांगोपांग अभ्यास होऊन स्थानिक बचत गट, महिला मंडळे, शेतकरी उत्पादक कंपण्यांच्या द्वारे बाजारपेठेत स्थान मिळऊन देणे स्थानिक रोजगाराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. स्थानिक खाद्य पदार्थांचा शोध घेणे, त्यांच्या निर्माण प्रक्रियेचा अभ्यास करुन बाजार पेठेच्या दृष्टीने त्यांचे प्रमाणीकरण करणे, त्यातील पोषण मुल्यांचा अभ्यास करणे, त्यांचे ब्रांडींग करणे व बाजार पेठेत त्याला स्थान मिळावे म्हणून प्रयत्न झाल्यास विकेंद्रित स्वरुपात एक मोठेच रोजगाराचे दालन ग्रामिण भागात निर्माण होऊ शकते. त्या दृष्टीने वाशिम जिल्ह्यातील स्थानिक खाद्य प्रकारांच्या बाबतीत प्रक्रिया उभी करण्याचा आमचा मानस आहे.

धेय्य
खाद्य विविधतेची वाढत चाललेल्या गरजेची पुर्ततेच्या दृष्टीने प्रयत्न करणे. छोटे व सिमांत शेतक-यांना शाश्वत अन्न चळवळीचा भाग बनऊन शेती उत्पादनाना फायदा मिळऊन देणे. पोषण मुल्यांच्या शाश्वततेसाठी अन्न विविधतेला प्रमोट करणे. पोषन मुल्यांनी परिपुर्ण असे अन्न वाजवी दरात सगळ्यांना कसे मिळेल याची तजवीज करणे.

2.  उद्दीष्ट्ये

1.    वाशिम जिल्ह्यातील विविध प्रकारच्या स्थानिक, पारंपरिक खाद्य पदार्थांची जंत्री तयार करणे.
2.    उपरोक्त खाद्य पदार्थांच्या निर्माण प्रक्रियेचा डेटाबेस तयार करणे व त्याच्या पोषण मुल्यांची तपासणी करणे.
3.    उपरोक्त खाद्य पदार्थांच्या निर्माण प्रक्रियेचे प्रमाणीकरण करणे (standerdization) जेणे करुन भविष्यकालीन बाजार पेठेकरीता एक प्रकारच्या खाद्य पदार्थांचा पुरवठा करता येईल.
4.    उपरोक्त खाद्य पदार्थांच्या बाबतीत ग्रामिण भागात विकेंद्रित पद्धतीने महिला बचत गट इत्यादींच्या सहाय्याने मुल्य साखळी (Value chain) निर्माण करणे.
5.    शेतकरी उत्पादक कंपनीच्या द्वारे विकेंद्रित पद्धतीने निर्माण झालेल्या विविध स्थानिक खाद्य पदार्थांचे संकलन, आकर्षक पॅकींग, ब्रांडींग व विक्रीची अत्याधुनिक व्यवस्था उभारणे.
6.    स्थानिक उपलब्ध नैसर्गिक संसाधन व पिक पद्धतींवर स्थानिक खाद्य व्यवस्था उत्क्रांत झालेली असल्याने नैसर्गिक संसाधने (उदा. चारोळी, मोहा फुल, गोडंबी इत्यादी) स्थानिक ठिकाणी कसे वाढतील तसेच शेतातील विविधता कशी बळकट होईल याची लोक चळवळ उभारणे.

3.  नेमकं कसं करता येईल?

1.    सद्या वाशिम जिल्ह्यापासुन सुरु करता येईल. सर्व प्रथम विविध गावांमधील, विविध जन जातींमध्ये प्रचलीत पारंपरिक खाद्य पदार्थांचा शोध घेणे.
2.    त्या खाद्य पदार्थांच्या स्थानिक निर्माण प्रक्रियेची माहिती गोळा करणे.
3.    त्या सर्व खाद्य पदार्थांच्या निर्माण प्रक्रियेकरीतासमान निर्माण प्रक्रिया” (Standard Operating Protocol) चे निर्माण करणे.
4.    निवडक खाद्य पदार्थांच्या पोषण मुल्यांचा डेटा बेस निर्माण करणे.
5.    निवडक खाद्य पदार्थांच्या निर्मितीकरीता विकेंद्रित स्वरुपात गावागावांमध्ये व्यवस्था निर्माण करणे. यात खास करुन महिला बचत गट, महिला मंडळांचा सहभाग निश्चित करणे. निर्माण केलेल्या सर्व व्यवस्था मोबाईल अप सारख्या साधनांनी केंद्रिय व्यवस्थेशी (उदा. शेतकरी उत्पादक कंपनी) जोडणे. केंद्रिय ठिकाणी एकत्रिकरणाची व्यवस्था निर्माण करणे.
6.    शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या द्वारे निवडक खाद्य पदार्थांचं ब्रांडींग करणे. आकर्षक पॅकेजींग करणे. आधुनिक मार्केटींगच्या साधनांचा वापर करुन पुरवठा साखळी निर्माण करणे.

4.  यातुन काय निष्पन्न होईल?

1.    स्थानिक पारंपरिक खाद्य पदार्थांच्या बाबतीत एक इत्यंभुत डेटा बेसचे निर्माण होईल.
2.    स्थानिक ठिकाणी मोठा रोजगार निर्माण होईल. या रोजगाराच्या प्रक्रियेत ग्रामिण भागातील खासकरुन स्त्रिया, युवक, बाहेरुन ग्रामिण भागात परत आलेले स्किल्ड कामगारांचा उपयोग करुन घेता येईल.
3.    स्थानिक पारंपरिक खाद्य पदार्थांच्या पोषण मुल्यांच्या बाबतीत माहिती निर्माण होऊन, ब्रांडींग होऊन  त्यांच्या राष्ट्रिय तसेच आंतर्राष्ट्रीय बाजार पेठेत जागा मिळवण्याच्या बाबतीत मार्ग सुकर होईल.
4.    पारंपरिक खाद्य पदार्थात मुल्यवर्धन होऊन त्यांच्या साठी लागणा-या पारंपरिक मात्र सद्या विलुप्त होत असलेल्या पिकांच्या लागवडी करीता प्रयत्न केल्यास जैवविविधतापुर्ण पिक पद्धती पुन्हा नव्याने पुनरस्थापीत करता येईल.